33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन'सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व' राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

टीम लय भारी

पुणे : आगामी ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी दिली आहे. याच दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेवरून सध्या पुण्यात बॅनर्सची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे बॅनर्स आज सकाळी पुण्यात लावले आहेत.(Raj Thackeray against Banner hoisting in Pune)

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर यापूर्वी विरोध दर्शवला होता. आता राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असं या बॅनर्सवर लिहिण्यात आलं आहे. तसं अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं म्हटलं आहे. हे बॅनर्स पुण्यात कोणी लावले आहेत याबाबत अद्याप काही समजू शकलेलं नाही. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुड येथील करिष्मा चौक येथे हे निनावी बॅनर्स दिसून आले आहेत.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा

शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर ३ तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल’ असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तर ५ जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रकार परिषेद केली.

हे सुद्धा वाचा :- 

Raj Thackeray’s Loudspeaker Threat: Will MVA Allow Him to Play BJP’s Game?

भोंग्यांबाबत दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत : मोहित कंबोज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी