30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराज ठाकरे यांचे आवाहन मुस्लिमांना ईद साजरी करू द्या !

राज ठाकरे यांचे आवाहन मुस्लिमांना ईद साजरी करू द्या !

टीम लय भारी

मुंबई: राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे ३ मेपर्यंत न काढल्यास त्यासमोर हनुमान चालिसा मोठ्या आवाजात वाजविली जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. यावरुन राज्यातील राजकरण तापले होते. कालच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या. मात्र त्यांनी भोंग्यांवरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरवरुन पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी महाराष्ट्र सैनिकांसना आवाहन केले आहे. ईदच्या दिवशी मुस्लिमांना त्यांचा सण आनंदाने साजरा करु द्या असं म्हटलंय. “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका,” असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.

“आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमका काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन,” असंही राज यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: 

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं केलं कौतुक

Raj Thackeray Appeals To Maharashtra To Vote For Demolition Crew From India’s Got Talent

भाजप व मनसेचा भोंगा आणि जनतेचे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी