28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयराज ठाकरे यंदा फुल्ल फॉर्म मध्ये, यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं; सोबत...

राज ठाकरे यंदा फुल्ल फॉर्म मध्ये, यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं; सोबत राज ठाकरेंकडून पुन्हा मराठी कार्ड!

टीम लय भारी

मुंबई : राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या काही दिवसातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.  बऱ्याच राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पूर्णपणे तयारीत आहेत असे दिसून येत आहे.(Raj Thackeray is in full form this year)

 राज ठाकरे यांनी मुंबईतील कांदिवली भागात मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, व त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला घेऊन एक मोठं वक्तव्य भर सभेत मांडलं.

राज ठाकरे म्हणाले, काही दिवसातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई सोबतच इतरही महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसातच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल. त्यावर ते असेही म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत इतर राजकीय पक्ष वर्तवत असताना राज ठाकरे यांनी इतक्यात निवडणुकांची शक्यता दिसत नाही असे वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मनसे नेते संदीप देशपांडे संतापले, शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा केला निषेध

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा पार पडणार मुंबईबाहेर

‘हिंदू हृदयसम्राट’ पोस्टरवरुन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

Raj Thackeray walks the talk, Maharashtra’s ‘Blueprint’ ready

राज्यातल्या अनेक महापालिकांच्या मुदती संपत आल्याने महापालिकेवर प्रशासकही नेमण्यात आले आहेत. निवडणुकासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नवी प्रभागरचनाही सर्व महानगरपालिकांची सादर झाली आहे. अशावेळी राज ठाकरेंचं हे वक्तव्य कोणते संकेत देत आहे, हे कळायला मार्ग नाही.

यावेळी बोलताना निवडणुकांबाबत तर राज ठाकरेंनी भाष्य केलेच. मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, यंदा निर्धार करायचा, यंदा निर्धार करा, इतर राजकीय पक्षांना हाणायंच म्हणजे हायणायचं असेही ते म्हणाले, त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गाजावाजा केला.

त्यावर मराठी भाषेचा विषय निघता ते आक्रमक होऊन म्हणाले, आज मुंबई ही मराठी माणसाचीची आहे. आणि त्यांच्यासाठीच मी मराठी कार्ड काढलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने राज्यभर अनेकदा खळ्ळखट्याकही केलं आहे. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा फोन लावल्यावर येणारा आवाज असो, सर्व मराठीत हवे यासाठी राज ठाकरेंनी अनेकदा आक्रमक झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी