महाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची नाराजी दूर?

आज वसंत मोरे यांनी या भेटीवर प्रतिक्रीया देत असं म्हटलं की, सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे,”

टीम लय भारी 

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची नाराजी दूर?

मुंबई : आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील निवासस्थानी मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी भेट घेतली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या विधानावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज वसंत मोरे यांनी या भेटीवर प्रतिक्रीया देत असं म्हटलं की, सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे,” Raj Thackeray meet vasant more

 “मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलंय.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईत झालेल्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असं विधान केलं. या विधानामुळे राज्यात राजकारण तापले होते. मनसेमधून  ही या विधानावर नाराजी होती. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती.

या भूमिकेमुळे वसंत मोरे यांना काही तासात शहराध्यक्ष पदावरून बाजूला केले आणि त्यांच्या जागी मनसेचे  गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे काही मोजक्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. त्यामुळे हे नाराजी नाट्य वाढणार की दूर होणार हे येत्या काळात समजलं.

 

हे सुध्दा वाचा:

राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, घाटकोपर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली

Ready to face any punishment for Raj Thackeray: Sacked Pune MNS chief after mosque row

इंधन दरवाढी विषयी प्रश्न विचारता,केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी काढला पळ

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close