31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ

राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ

टीम लय भारी

मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीटच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेब सभेला संबोधित करत आहे.ते म्हणतात, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद” असं म्हणताना दिसत आहेत.मनसेने हा व्हिडिओ शेअर नाव न घेता शिवसेनेवर टीका केली आहे.

राज (Raj Thackeray) यांनी ट्विटच्या माध्यामतून पत्र शेअर केली आहेत. या पत्रात त्यांनी देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.मनसेच्या या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अनेक ठिकाणी स्वत: भेट देत आढावा घेतला आहे. तर, काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

राज ठाकरे यांचे आवाहन मुस्लिमांना ईद साजरी करू द्या !

Raj Thackeray’s “Deadline” Ends, Mumbai On Alert Amid Loudspeaker Row: 10 Points

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी