34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबई'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका', राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खुलं आवहान

‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खुलं आवहान

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण होत आहे. या मुद्द्यावरून ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून काही ठिकाणी कारवाई केली होती. यासंदर्भात आज मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून हे पत्र ट्वीट केलं आहे. (Raj Thackeray open challenge to the Chief Minister)

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे : राज ठाकरे

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची याआधीचे पत्र हे विनंती करणारे आणि मागणी मांडणारे होते. पण यावेळी त्यांनी पत्रातून थेट इशारा दिला आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray)  यांची स्वाक्षरीदेखील आहे.

हे सुध्दा वाचा :- 

“Those Already Charged…”: Sena’s Aaditya Thackeray’s Dig At Raj Thackeray

मंत्री सुभाष देसाईंचा कल्पक उपक्रम, निर्माण केले पहिले ‘मधा’चे गाव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी