29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, घाटकोपर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात...

राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, घाटकोपर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली

टीम लय भारी

मुंबई: मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंचे (Raj Thackeray) काल गुडीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर भाषण झाले. या भाषणात राज ठाकरेंनी महाविकासआघाडी जोरदार टिकाबाजी केली. त्याच बरोबर अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) काल पाडवा मेळाव्यामध्ये म्हटले. यानंतर आता मनसे सैनिक आक्रमक झाले असून, आज घाटकोपर येथे मनसे-विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयावर भोंगे लावून पूर्ण दिवस हनुमान चालीसा व गणपती आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

प्रार्थनेला माझा विरोध नाही पण मशिदी वरील लावलेले भोंगे खाली उतरावे लागतील सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर भोंग्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. प्रार्थना करा पण घरात. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिरं आहेत धाडी टाकुन बघा काय मिळणार त्यात. तुम्ही मदरशामध्ये धाडी टाका काय मिळते पहा असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

मनसेचा कार्यकर्ता भानुशाली यांची प्रतिक्रिया

मनसेचा कार्यकर्ता म्हणून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून मी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली आहे. लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीच्या आरत्यांसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या वाजवल्या जाणार आहेत, असं देखील भानुशाली म्हणाले. यामुळे तणाव कसा निर्माण होऊ शकेल? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्यानं तणाव निर्माण होतो का? नाही ना? मग हिंदू धर्माची आरती वाजवली तर तणाव का निर्माण होईल? ते त्यांच्या धर्माचं काम करत आहेत. आम्ही आमच्या धर्माचं काम करत आहोत., असं भानुशाली म्हणाले.

हे सुध्दा वाचा : 

Remove Loudspeakers In Mosques: Raj Thackeray To Maharashtra Government

‘आदित्य ठाकरेंना खून करावासा वाटला तर, पहिल्यांदा नारायण राणेंचा करतील’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी