महाराष्ट्रराजकीय

न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटणाऱ्यांना 3 तारखेपर्यंत उत्तर देणार, राज ठाकरे यांच्या पुण्यातून मोठ्या घोषणा

३ तारखेपर्यंत त्यांना काही समजल नाही या देशातल्या कायद्यापेक्षा किंवा या देशातल्या सुप्रीम कोर्टापेक्षा या देशातल्या न्यायव्यवस्थेपेक्षा यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर  जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. त्यासाठी मनसे पक्षाची सर्व बाजूनी तयारी सुरु आहे,असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

टीम लय भारी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगाप्रकरणावरुन पुण्यात पत्रकार परिषद घेतली.  त्यामुळे हा विषय हिंदूनी त्रास होत आहे असं नाही हा विषयाचा मुस्लीमांनाही त्रास होत आहे. तुम्ही जर पाचवेळा भोंगे लावत असाल तर आम्ही हनुमान चालिसा लावू. ३ तारखेपर्यंत त्यांना काही समजल नाही या देशातल्या कायद्यापेक्षा किंवा या देशातल्या सुप्रीम कोर्टापेक्षा या देशातल्या न्यायव्यवस्थेपेक्षा यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर  जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. त्यासाठी मनसे पक्षाची सर्व बाजूनी तयारी सुरु आहे,असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Raj Thackeray to visit Ayodhya on June 5)

न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटणाऱ्यांना 3 तारखेपर्यंत उत्तर देणार, राज ठाकरे यांच्या पुण्यातून मोठ्या घोषणा

यावेळी  देशभरातल्या सर्वांना एवढचं सांगण आहे की भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून तो सामाजिक आहे त्याच्याकडे त्याच अनुषंगाने पाहणं आवश्यक आहे. या महाराष्ट्रात किंवा देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली किंवा हाणामारी नको आहेत. या देशातील महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाही. माणूसकीच्या नात्याने मुस्लीम धर्मीयांनी विचार केला पाहीजे. त्यांच्या प्रार्थनेला कोणी विरोध केलेला नाही. परंतु त्यांना जर त्यांची प्रार्थना लाऊडस्पीकरवरुनच ऐकवायची असेल तर आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकर वरुन ऐकाव्या लागतील, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावले

एक मुस्लीम पत्रकार आहेत. त्यांनी एक किस्सा बाळा नांदगावकर यांना  सांगितला की माझ मुलं लहान आहे तुमचा हा मशिदीतला गोंगाट बंद करा असं मी स्वत: मशिदीमध्ये जाऊन सांगितलं. त्यामुळे हा विषय हिंदूनी त्रास होत आहे असं नाही हा विषयाचा मुस्लीमांनाही त्रास होत आहे. तुम्ही जर पाचवेळा भोंगे लावत असाल तर आम्ही हनुमान चालिसा लावू. आता रमजान चालू असल्यामुळे मला कोणीतीही गोष्ट करायची नाही,असे राज ठाकरे म्हणाले.

1 मे महाराष्ट्र दिनी  संभाजीनगर येथील सांस्कृतिक मंडळाच्या  मैदानात  जाहीर सभा घेणार आहे. ५ जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. बरेच दिवस प्रवास नाही केला त्यामुळे अयोध्येला जाण्याचा उद्देश आहे.  ५ तारखेला अयोध्येला पोहचून दर्शन घेईन तुम्ही पण सर्वजण यावं, अशा दोन घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी केल्या.

शांतता भंग करणाऱ्या भोंग्यांना परमिट देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याही पलिकडे जाऊन आपण स्वत: काही समजणार आहोत की नाही. मुस्लीम समाजालाही समजले पाहिजे देशापेक्षा काही धर्म मोठा नाही.लोकांना या भोंग्यांचा त्रास होतो आहे याची कल्पना त्यांना येणे आवश्यक आहे.सर्व मशिदींवरील लाऊडस्पीकर अनधिकृत नाही आहेत मग आमच्या कार्यकर्त्यांनी लावलेले लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत असं कशावरुन म्हणता, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे.

नवहिंदू ओवेसी असं तुम्हाला म्हटलं जात आहे या प्रश्नावर राज ठाकरे यांनीमी आता लवंड्यांबद्दल नाही बोलणार असे उत्तर दिले.
मला हेच म्हणायचं आहे की, जेव्हा आमच्याकडून मिरवणूका निघाल्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचे हात काय बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात धरता येतो. जे समोर कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हाती द्यायला लावू नका.असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.राज ठाकरे भाजपची बी टीम आहे यावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिले नाही.

 


हे सुद्धा वाचा : 

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

On loudspeaker row, Raj Thackeray says Muslims should understand…

कोमेजलेले राज ठाकरे !

राज ठाकरे यंदा फुल्ल फॉर्म मध्ये, यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं; सोबत राज ठाकरेंकडून पुन्हा मराठी कार्ड!

राष्ट्रीय महामार्गावरील वडाळी खदान जवळ टँकर जळून खाक

 

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close