34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईगर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा होईल, मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार : राजेश टोपे

गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा होईल, मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार : राजेश टोपे

टीम लय भारी 

मुंबई: देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात निर्बंध हटल्यानंतर कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येते आहे. राज्यातल्या कोरोना टास्क फोर्सने गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करावी असं सुचवलं आहे. आज मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. मास्कच्या बाबतीत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं आरोग्यमंत्र्यांनी (Rajesh Tope) म्हटले आहे. Rajesh Tope side Masks will be mandatory

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतला तसेच काही सुचना राज्यांना दिल्या आहेत. लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

 देशातील बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. याबाबत शिक्षक आणि पालकांनी जागरुक राहावे, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे असं पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून कोरोनावरील निर्बंध हटवले होते. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या किंचित वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती भाष्य केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

पंतप्रधानांनी कोरोना आढावा बैठकीत बोलण्याची दिली नाही संधी, राजेश टोपे यांनी व्यक्त केली खंत

Maharashtra To Lift All Covid-19 Curbs, Make Face Masks Optional From April 2: Health Minister

नवनीत राणांची नरेंद्र मोदींवर टीका, शरद पवारांचे केले कौतुक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी