29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeटॉप न्यूजमला आमदारकीशी देणं घेणं नाही :राजू शेट्टी

मला आमदारकीशी देणं घेणं नाही :राजू शेट्टी

टीम लय भारी 

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. आता सरकारला स्वता:च्या कामकाजाचे परीक्षण करण्याची गरज आहे. या सरकारची स्थापना झाली, तेव्हा अनेक नेत्यांनी म्हटलं होतं की, आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येतं आहोत. मग या कार्यक्रमाचे पुढे काय झाले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ग्रामीण भागात काम करणारी संघटना आहे. मात्र आमच्या सारख्या लहान पक्षांसोबत महाविकास आघाडीने कधी संवाद साधलेला नाही. आम्ही येत्या ५ एप्रिलला या सगळ्या गोष्टींची समीक्षा करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकारने तर ऊस उत्पादकांच्या एफआरपीचेही राज्य सरकारने तुकडे केलं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपच्या काळातील सगळ्याच योजना वाईट नव्हत्या, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने विधानपरिषदेत स्वाभिमानीला एक जागा द्यायची, असा शब्द दिला होता. त्यांनी दिलेला हा शब्द पाळायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. स्वाभिमानीला काही फरक पडत नाही. मी ऑगस्ट महिन्यातच सांगितलं मला होतं आमदारकीशी देणं घेणं नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी