31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईराजू शेट्टी 'महाविकास आघाडी'तून नक्की का बाहेर पडले ते समजत नाही :...

राजू शेट्टी ‘महाविकास आघाडी’तून नक्की का बाहेर पडले ते समजत नाही : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : राजू शेट्टी (Raju shetty) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहीत नाही. त्यांनी एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली व त्यांच्या कामांना नकार दिला असंही काही झालेलं आठवत नाही त्यामुळे राजू शेट्टी (Raju shetty) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. (Raju shetty will leave the mahavikas aghadi government)

आज कोल्हापूरमध्ये माध्यामांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले

राजू शेट्टी (Raju shetty) महाविकास आघाडीतून का बाहेर गेले माहीत नाही. आमचं सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात जेवढी मदत केली आहे ती यापूर्वी कधीच झाली नाही. आमच्या सरकारने आल्या आल्या दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोना काळातदेखील शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट आम्ही विसरलो नाही.अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ५० हजार रुपयांपर्यंत नियमित कर्ज भरले आहे त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी यावर्षी होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

देशात व राज्यात भाजप या देशातील शेतकऱ्यांना चिरडत आहे. शेतकरी ट्रॅक्टर वापरतो त्याचेही दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर वाढले आहे. या सगळ्या गोष्टी शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे राजू शेट्टी (Raju shetty) यांनी महाविकास आघाडीसोबत राहून याचा प्रतिवाद करायला हवा यासाठी सर्व पक्षांची ताकद घेऊन देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घालावे हे अभिप्रेत आहे असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

MVA betrayed farmers, says Raju Shetti

सुट्टीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला : सुप्रिया सुळे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी