मुंबईराजकीय

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पक्षात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते.

टीम लय भारी

मुंबई : अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पक्षात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या ५२ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. (Ramesh Latke ShivSena MLA dies of heart attack)

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत (Ramesh Latke) ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते.

तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच (Ramesh Latke) आमदार म्हणून निवडून गेले.
२०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे १६ हजार ९६५ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

हे सुध्दा वाचा :- 

Shiv Sena MLA From Mumbai Dies During Family Vacation In Dubai

नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण : किशोरी पेडणेकर

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close