टीम लय भारी
मुंबई : अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पक्षात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या ५२ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. (Ramesh Latke ShivSena MLA dies of heart attack)
विधानसभेतील आमचे सहकारी, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.
नगरसेवक ते आमदार या प्रवासात मोठा परिवार त्यांनी जोडला. उमद्या मनाचा एक सच्चा कार्यकर्ता.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांचे कुटुंबीय, आप्तजनांच्या दुःखात सहभागी आहे.
ॐ शान्ति 🙏 pic.twitter.com/kECGqfJatI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 12, 2022
लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत (Ramesh Latke) ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते.
तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच (Ramesh Latke) आमदार म्हणून निवडून गेले.
२०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे १६ हजार ९६५ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
हे सुध्दा वाचा :-
Shiv Sena MLA From Mumbai Dies During Family Vacation In Dubai
नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण : किशोरी पेडणेकर