30 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमुंबईरमजान ईदच्या दिवशी खारका का खाल्या जातात ?

रमजान ईदच्या दिवशी खारका का खाल्या जातात ?

टीम लय भारी

मुंबई : मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र महिना म्हणजे रमजान हा महिना मानला जातो, अगदी आबालवृद्धांपासून सगळेच या महिन्यात मोठ्या उत्साहाने रोजे ठेवतात, भल्या पहाटे सहरीच्या भोजनानंतर सुरू झालेला त्यांचा उपवास थेट संध्याकाळी इफ्तारला सोडला जातो. रमजान महिन्यात सुरू असलेले रोजे रमजान ईद (Ramzan eid mubarak) दिनी सोडले जातात. या वर्षी ३ मे २०२२ रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. (Ramzan eid mubarak 3 may 2022 )

रमजान म्हणजे ‘बरकती’ आणि ईद (Ramzan eid mubarak) म्हणजे ‘आनंद’. परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद या दिवसाला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात. हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात २९-३० दिवसांचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र म्हणजे ईद (Ramzan eid mubarak) ही चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते, दानधर्म केला जातो.

ईदची सुरुवात कोणी केली 

‘जंग-ए-बदार’ ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ‘ईद-अल-फितर (Ramzan eid mubarak) साजरी केली होती. पवित्र कुरआन याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

रमजान आणि खाद्यसंस्कृती

ईदच्या दिवशी (Ramzan eid mubarak) सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहीभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारका खाण्याचीही पद्धत आहे. कारण महंमद पैंगबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शिरखुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात.

रमजानच्या दिवसांत मुंबईतील अनेक ठिकाणे वेगवेगळय़ा विशेष पदार्थासाठी प्रसिद्ध आहेत. केवळ मुस्लीमच नव्हे तर सर्व मांसाहारप्रेमी खवय्यांसाठी या पदार्थाचा आस्वाद घेणे ही पर्वणी असते. मुंबईतील महंमद अली रोड, भेंडीबाजार, बोहरी मोहोल्ला, माहीम मस्जिद गल्ली यांसारख्या ठिकाणी चविष्ट मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थाची रेलचेल असते. रमजानदरम्यान मिळणारी स्वादिष्ट नल्ली निहारी अगदी साजूक तूप, दही, बेसन, गरम मसाला, वेलची, केवडय़ाचे पाणी, तमालपत्र, सुगंधी मसाल्यांचा वापर करून बनवलेली असते. याशिवाय, सिख कबाब, कलेजी फ्राय किंवा गुरदा मसाला, मुंबईत नेहमीच मिळणारी फेटलेली अंडी आणि खिमा व मसाल्यांचा वापर करून तयार केलेली ‘बैदा रोटी’ हे सगळे पदार्थ (Ramzan eid mubarak) रमजान महिन्यात खाण्याची मज्जा फारच वेगळी असते.

रमजान ईद झाल्यानंरत अडीच महिन्यांनी बकरी ईद साजरी केली जाते

रमजान ईद (Ramzan eid mubarak)नंतर अडीच महिन्यांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो. या सणाची सुरुवात पैगंबर अब्राहम यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा :- 

Eid-ul-Fitr 2022: Crescent moon not sighted, Eid to be celebrated on May 3 in India

राज ठाकरे यांचे आवाहन मुस्लिमांना ईद साजरी करू द्या !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी