28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्ररणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर

रणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर

टीम लय भारी

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Dislay) गुरुजी यांना आणखी एक मानाचा पुरस्कार घोषित (Ranjitsinh Dislay Guruji announced another honorable award) करण्यात आला आहे. डिसले गुरुजी यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ या पुरस्काराने लवकरच गौरविण्यात येणार आहे. याआधी डिसले गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असा जागतिक ‘ग्लोबल टीचर’ हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय ठरले आहेत. डिसले गुरुजी यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाभरातून तसेच संपूर्ण राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डिसले गुरुजींनी त्यांना पुरस्कार जाहीर होताच याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबाकडून देण्यात येतो. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संगीत, महिला सबलीकरण आणि कोरोना महामारीत विशेष कार्य करणाऱ्या योध्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्काराचे आयोजन येत्या २७ जुलैला रामेश्वर येथे करण्यात आले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली’ असे मत डिसले गुरुजी यांच्याकडून ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत रणजितसिंह डिसले गुरुजी हे गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत आहेत. तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे दिसले गुरुजी यांची संपूर्ण जगात ओळख आहे. डिसले गुरुजी याना अमेरिका सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. यासाठी अमेरिकेत जाऊन अभ्यास करण्यासाठी डिसले गुरुजी लवकरच अमेरिकेला जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

अक्षर पटेलच्या विजयी खेळीने मोडीत काढला धोनीचा विक्रम

‘मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ राज्याला द्यायला हवा’, छगन भुजबळ यांची खंत

मुंबईकरांचे फोन चोरणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी