31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयभांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा

भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा

टीम लय भारी 

छत्तीसगढ : अनेकदा भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपच्या सुसंस्कृतपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची अनेक उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. भाजप मंत्रिमंडळात मोठमोठ्या पदावर कार्यरत असणारे नेते बेलगामपणे काहीतरी बोलून बसतात आणि नंतर केलेल्या विधानाची सारवासारव करतात. छत्तीसगडच्या एका भाजप नेत्याने भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

छत्तीसगडचे भाजप आमदार कृष्णमूर्ती बांधी यांनी बलात्कार, खून सारखे प्रकार थांबावे यासाठी अजब विधान केले आणि त्या विधानावर काॅंग्रेसने आता हल्लाबोल केला आहे. बांधी यांनी लोकांना दारू ऐवजी भांग आणि गांजा घ्या, यामुळे बलात्कार, खून, दरोडे असे गुन्हे घडणार नाहीत, असा गुन्ह्यांवरील अजब पर्याय कृष्णमूर्ती बांधी यांनी लोकांना सुचवला.

या विधानंतर लोकप्रतिनिधीच कसा नशा करण्याचा सल्ला देऊ शकतो, असा सवाल काँग्रेसने या निमित्ताने उपस्थित केला, तर देशामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता हवी असेल तर त्यांनी ही मागणी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे करावी, असा मिश्किल टोला छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बांधी यांना लगावला.

दरम्यान, त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार कृष्णमूर्ती बांधी म्हणाले की, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी आधीही अशी मागणी सभागृहात केली होती. मी म्हणालो होतो की, अल्कोहोलमुळे बलात्कार, खून, भांडणं होतात. पण भांग पिणाऱ्यांनी कधी खून, बलात्कार, केला आहे का? असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी केला आहे.

बांधी पुढे म्हणतात, दारुबंदीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने हा विचार करायला हवा की आपण भांग आणि गांजाच्या वापराकडे कसे वळू शकू. हे माझं वैयक्तिक मत आहे की जर लोकांना हे हवं आहे, तर त्यांना या गोष्टी द्यायला हव्यात, ज्यामुळे खून, बलात्कार किंवा इतर गुन्हे होणार नाहीत. भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आता त्यांच्यावर टिका सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा…

सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या नावे बनावट अध्यक्ष व सेक्रेटरींनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा 

आरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद, कारशेडच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, शपथविधी सोहळा संपन्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी