29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeजागतिकभारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

टीम लय भारी

गुजरात : कोणताही अपघात, सर्जरी असो यावेळी रक्ताची गरज भासतेच. शस्त्रक्रियेसाठी जो रक्तगट लागणार त्याचा त्यावेळी शोध घेऊन त्या रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सर्वसाधारणपणे शरीरातील रक्ताचे A, B, O, AB असे रक्तगट पाहायला मिळतात, परंतु भारतातील एका व्यक्तीचा या रक्तगटांपेक्षा वेगळा रक्तगट असल्याचे निदर्शनास आले आहे. हा रक्तगट दुर्मिळ असल्याचे सिद्ध झाले असून जगातील केवळ 9 लोकांसोबतच हा रक्तगट मॅच होतो.

गुजरात मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या शरीरात चार रक्तगटांपेक्षा वेगळाच, दुर्मिळ असा ‘ईएमएम निगेटिव्ह’ नावाचा रक्तगट आढळून आला आहे. या रक्तगटातील जगभरात केवळ नऊ माणसे असून ही व्यक्ती भारत देशातील पहिली आणि जगातील दहावी ठरली आहे.

गेल्या वर्षी या व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, तत्पूर्वी रक्ताची तरतूद व्हावी यासाठी त्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला. मात्र त्या रक्ताशी जुळणारे रक्त कुठेच सापडले नाही.

दरम्यान, यावर शहानिशा करण्यासाठी व्यक्तीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला, तेव्हा ते रक्त दुर्मिळ असल्याचे सिद्ध झाले. या तपासणीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण वर्षभराचा कालावधी लोटला आणि गेल्याच महिन्यात त्या व्यक्तीचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला.

आपल्या शरीरात सर्वसाधारणपणे रक्ताचे चार रक्तगट आढळतात. A, B, O, AB  आणि आरएच व डफी सारख्या 40 हून अधिक प्रणाली आणि 350 हून अधिक ॲंटिजन आपल्या शरीरात कार्यरत असतात. या व्यक्तीचा रक्तगट AB+ असून त्याची फ्रिक्वेन्सी ईएमएम निगेटीव्ह असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ही व्यक्ती दुर्मिळ रक्तगट असणारी भारतातील पहिली व्यक्ती ठरली आहे.

अशाप्रकारे दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला तिचा रक्तगट असलेल्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाकडून रक्त घेऊ शकत नाही, तसेच अशा व्यक्ती कोणाला रक्त देऊ सुद्धा शकत नाहीत.

हे सुद्धा वाचा…

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

शिंदे – फडणवीस सरकारचा लवकरच होणार शपथविधी

कर्मठ पुरूषी विचारांना चपराक; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी