29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीय चक्क 'एटीजी' मशिनमधून मिळतेय रेशन

 चक्क ‘एटीजी’ मशिनमधून मिळतेय रेशन

टीम लय भारी

भुवनेश्वर: एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाईम ग्रेन म्हणजेच ‘एटीजी’ मशिनमधून रेशन देण्याची तयारी सुरू आहे. ओडिशा सरकारने हा प्रयोग राबला असून लवकरच देशभरात हा प्रयोग राबवण्यात येईल. एटीएममधून पैसे तुम्ही काढले असतील शिवाय या मशीनमधून तुमच्या खात्यात पैसे भरले देखील असतील. पण आता एक अशी सुविधा सुरू होणार आहे, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून अन्नधान्य काढू शकणार आहात.

या मशिनमुळे रेशनवर होणारा काळाबाजार रोखण्यास नक्कीम मदत होण्याची शक्यता आहे. ओडिशा सरकारने हा अनोखा आणि तितकाच महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.ओडिशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्यासाठी ‘एटीजी’ मशीनचा वापर केला जाईल.अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतानु एस नायक यांनी ही माहिती दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले. सर्व प्रथम भुवनेश्वरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

शरद पवारांचे निकटवर्तीय ‘प्रफुल्ल पटेलां’ना ईडीचा जोरदार धक्का

‘द्रौपदी मुर्मू’ यांचा विजय निश्चित; निकाल लागण्यापूर्वीच देशभरात जल्लोष

VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी