33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयसेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

सेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांना शिवसेनेच्या गटनेता पदावरून काढून टाकण्यात आले. तर त्या पदावर आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये असंतोष असल्याचे समजते.

बंडखोरी केलेल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असलेल्या आमदारांनी सेनेच्या नव्या गटनेत्याला विरोध केला आहे. सर्वाधिक आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे पक्षाचा गटनेता ठरविण्याचा हक्क देखील आम्हाला असल्याचे बंडखोर आमदारांनी सांगितले आहे. परंतु शिवसेना पक्ष घेत असलेले सर्वच निर्णय आता या बंडखोर आमदारांना अमान्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तर आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वावर नाराज नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज आहोत, असेही काही बंड केलेल्या आमदारांनी सांगितले. म्हणजेच सत्ता हातात असताना देखील सत्तेचा कंट्रोलर हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यानेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंडखोरी करून सेनेला धक्का दिल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, सुरतेवरून निघालेली बंडखोर आमदारांची स्वारी थेट गुवाहाटीत जाऊन पोहोचली आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या ४० बंडखोर आमदारांमध्ये आणखी १० आमदार सहभागी होणार आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आमच्याकडे ५० आमदार असतील असा आत्मविश्वास या बंडखोर आमदारांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा :

‘आमचे आमदार आमच्यासोबत’

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी