33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeटॉप न्यूजअमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावले

अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावले

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. या सगळ्या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणेंनी खडेबोल सुनावले आहेत.

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहून रेणुका शहाणे संतापल्या आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीसांवर राग व्यक्त केला आहे.

मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका…

“सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय मुद्दा करु नका. तसंच मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका. जर तुमच्याकडे क्षमता आणि ताकद असेल तर त्याचा वापर पोलिसांची मदत करण्यासाठी करा. जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर असं वक्तव्य केलं असतं का?”, असा सवाल रेणुका शहाणेंनी विचारला आहे.

त्यावेळी मुंबईत राहणं असुरक्षित आहे असं ट्विट केलं होतं का?

पुढे त्या म्हणतात, “एक लक्षात असू द्या देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना एल्फिन्स्टन पूलदेखील कोसळला होता. त्यात मुंबईतील अनेक जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, त्यावेळी मुंबईत राहणं असुरक्षित आहे किंवा मुंबईमध्ये माणुसकी नाहीये वगैरे असं कोणतंच ट्विट केलं नव्हतं?” रेणुका शहाणेच नव्हे तर अनेकांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी