28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांची जामखेडमध्ये भेट!

आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांची जामखेडमध्ये भेट!

टीम लय भारी 

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघाला  विधिमंडळाच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती’ने आज भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम जी मोरे आणि सदस्य आमदार संजय दौंड, डॉ.रत्नाकर गुट्टे, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  आणि बळवंत जी वानखेडे या रोहित पावर यांनी जामखेडमध्ये स्वागत केलं. Rohit Pawar and Gopichand Padalkar in Jamkhed 

याप्रसंगी राजकारणाती दोन विरोधकांची भेट झाली आहे. भाजप नेते आणि राष्ट्रवादी नेते यांच्यात सतत वाद होतं असतो. आरोप – प्रत्युत्तर घडत असतं. रोहित पवार (Rohit Pawar) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भेटची राजकीय वर्तुळात चर्चा होतं आहे.

या समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर समितीने काही ठराविक कामांनाही भेट दिल्या आहे. यावेळी जामखेडमध्ये डीपीसी अंतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोल्यांच्या कामाचं समिती सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी ऐतिहासिक खर्ड्याच्या किल्ल्याला भेट दिली आणि इथं उभारलेल्या देशातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाची पाहणी केली. तसंच संत श्री सिताराम बाबा आणि संत श्री गीतेबाबा या दोन्ही गडावरील समाधीचं दर्शन घेऊन इथं सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.

हे सुद्धा वाचा: 

राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होत आहे :  रोहित पवार

NCP leader Amol Mitkari makes fun of Hindu rituals like Kanyadaan and spreads lies, other NCP leaders sitting on the dais laugh

मी पुन्हा कधीही येऊ शकणार नाही’ याची फडणवीसांना भीती : Atul Londhe

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी