महाराष्ट्रराजकीय

देशात असलेल्या महागाईला केंद्र सरकार कारणीभूत राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून उपयोग नाही :  रोहित पवार

पंतप्रधानांना भाजपेतर सत्ता असलेल्या राज्यात पेट्रोलच्या वाढत्या भावावरुन निशाना साधला होता. यावर कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत काही मुद्दयावर भाष्य केले आहे. रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची बाजू जोरकसपणे मांडताच राज्यातील भाजप नेत्यांचा मात्र तिळपापड झाला.

टीम लय भारी 

देशात असलेल्या महागाईला केंद्र सरकार कारणीभूत राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून उपयोग नाही :  रोहित पवार

मुंबई:  पंतप्रधानांना भाजपेतर सत्ता असलेल्या राज्यात पेट्रोलच्या वाढत्या भावावरुन निशाना साधला होता. यावर कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी भाजपवर टीका करत काही मुद्दयावर भाष्य केले आहे. रोहित पवार (Rohit pawar) आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची बाजू जोरकसपणे मांडताच राज्यातील भाजप नेत्यांचा मात्र तिळपापड झाला. Rohit pawar ask some questions modi sarkar

राज्याच्या हिताच्या गोष्टी बोलण्याची वेळ येते तेंव्हा काही न बोलणारे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब लगेच राज्य सरकारवर टीका करायला आतुर झालेलेच असतात.विरोधी पक्षाने राज्य शासनावर टिका करण्याआधी त्यांनी आपल्या कार्यकाळातील पेट्रोल-डिझेलवरील कर रचना बघायला हवी आणि राज्य शासनाची आजची भूमिका समजून घ्यावी, ही विनंती ही रोहित पवार (Rohit pawar) यांनी केली आहे.

या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेलवर जो VAT आकाराला जात होता त्यांचा उल्लेख केला आहे. हाच 25% – 21% स्लॅब आज आकारला जात आहे याची आठवण रोहित यांनी करुन दिली आहे.पुढे ते म्हणतात की, आज डिझेलवर केंद्राचा कर 22 रु आहे तर राज्याचा कर 20 रुपये आहे. त्यामुळं डिझेल दरवाढीसंदर्भात राज्याचा प्रश्नच येत नाही.

पेट्रोलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्राचा कर 28 रु आणि राज्याचा कर 32 रु आहे. राज्य शासन टक्केवारीमध्ये vat आकारत असल्याने राज्याचा कर हा सध्याच्या स्थितीला जास्त दिसतो, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच राज्याचा कर आपोआप कमी होत असतो, याची माहिती फडणवीस साहेबांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी राज्यसरकारला कारणीभूत ठरवणे पूर्णतः चुकीचे आहे असं मत रोहित यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र राज्याला मदत देताना सापत्न वागणूक देत असल्याची मुख्यमंत्र्यांची तक्रार योग्यच आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  तौक्ते वादळाच्या वेळेस पंतप्रधान साहेबांनी शेजारील गुजरात राज्याची पाहणी करून तत्काळ एक हजार कोटीची मदत दिली आणि आपल्या महाराष्ट्राला मात्र एक रुपयाही दिला नाही अशी खतं त्यांनी व्यक्त केली आहे.

देशातील महागाईवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी किमान महागाई आहे हे तरी केंद्र सरकारने मान्य करावं तरच त्यावर उपाय शोधता येईल. अन्यथा नाही-नाही म्हणत जखम लपवून कधी सेप्टिक होऊन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवेल हे कळणारही नाही, याचं भान केंद्रीय नेतृत्वाने ठेवायला हवं असं ही पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘मिशन वात्सल्य आणि बाल संगोपन मेळावा’ संपन्न

Now, NCP leader wants Shah nod to read scriptures of all faith outside PM’s residence

राजकारणातील खुळे… आणि सुप्रियाताई सुळे ! | NCP | Supriya Sule | Hemat Desai

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close