29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांनी विधानसभेत मांडलं पोलिसांचे दुखणे!

रोहित पवारांनी विधानसभेत मांडलं पोलिसांचे दुखणे!

टीम लय भारी

मुंबई: राज्यात नागरिकांना अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची घरं, कॅशलेस आरोग्य सुविधा, किरकोळ रजा या प्रश्नांवर लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. गुरुवारी विधिमंडळात आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) या विषयावर सरकारला प्रश्न विचारले आहे.  Rohit Pawar has asked the government

पोलिसांना चांगली आरोग्य सुविधा देणारी कॅशलेस रुग्णालयात संख्या वाढवता येईल का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे. निवृत्ती नंतर राज्यातील पोलिसांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येईल का तसेच आरोग्य पोलिसांना आरोग्य विमा मिळू शकतो का?  असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना आपलं हक्काचं घर लवकर मिळावं यासाठी आपण काय उपयोजना करणार आहोत. पोलीस कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसांच्या रजा वाढल्या पाहिजेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आता त्या रजा २०  दिवसांच्या केल्या आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई  यांनी सभागृहात दिली आहे.  गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई  यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी त्रस्त जनतेला दिला दिलासा, मतदारसंघात घेतला मोठा निर्णय

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी टिपले वाघोबांना !

रामराजेंनी ८२ धावा केल्या, थोडक्यात सेंच्यूरी हुकली

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी