32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयरोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

रोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

टीम लय भारी

कर्जत – जामखेड: राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’ सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. Rohit Pawar criticism on MNS

अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण काय होतं हे राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत सांगितलं. आपला दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

रोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

कर्जत- जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसेवर जोरदार निशान साधला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यातून मनसेला सल्ला दिला आहे. रोहित पवार (Rohit Pawar)  म्हणतात की,

राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी MNS Adhikrut ला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

 राहिला प्रश्न आदरणीय Sharad Pawar साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत…

मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल.

रोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

हे सुद्धा वाचा: 

राज्यात राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण अंतर्गत जनजागृती, ठाणे जिल्हात हत्तीरोग दुरीकरण मोहिम

Rahul Gandhi Not Part Of Congress Task Force 2024, Ghulam Nabi & Kharge In Political Affairs Group

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी