महाराष्ट्रराजकीय

एकीकडे संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचे आणि दुसरीकडे खोटा कळवळा दाखवायचा :  रोहित पवार

दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली एका नेत्याने धार्मिक द्वेषाच्या विषयाला सुरवात केली. आज तुम्ही त्या विषयाला पुढं नेत आहात. उद्या तुमच्या पक्षाचे छोटे-मोठे नेते धार्मिक द्वेषाच्या भावनेने सुसाट पळत सुटतील आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील.

टीम लय भारी : 

एकीकडे संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचे आणि दुसरीकडे खोटा कळवळा दाखवायचा :  रोहित पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आमदार रोहित यांनी फडणवीस यांना सल्ला देखील दिला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असं म्हटले की,

दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली एका नेत्याने धार्मिक द्वेषाच्या विषयाला सुरवात केली. आज तुम्ही त्या विषयाला पुढं नेत आहात. उद्या तुमच्या पक्षाचे छोटे-मोठे नेते धार्मिक द्वेषाच्या भावनेने सुसाट पळत सुटतील आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील.

मुंबई महापालिकेसह राज्यातील येणाऱ्या निवडणुका बघून तुम्हाला कोणता अजेंडा सेट करायचा आहे, हे जनता जाणून आहे. अजेंडा सेट करायचाचं असेल तर मग महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल दरवाढ यासारख्या जनतेच्या मूळ प्रश्नांशी संबंधित अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करा, यातच सामान्यांचं हित आहे. काल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांनी असे म्हटलं की,

लोकशाही,धर्मनिरपेक्षता,संघराज्यवाद, समता, सामाजिक न्याय,मूलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. तो जपणं हीच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे.पण एकीकडं संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचं आणि दुसरीकडं खोटा कळवळा दाखवायचा हा तुमचा इतिहास आहे. त्यांनी या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना टॅग देखील केले आहे.

हे सुध्दा वाचा: 

रोहित पवारांनी विधानसभेत मांडलं पोलिसांचे दुखणे!

Rohit Pawar in Karjat Jamkhed Election Results 2019: Rohit Pawar of NCP Wins

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close