28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रचिमुकल्यासाठी आमदार रोहित पवार ठरले देवदूत!

चिमुकल्यासाठी आमदार रोहित पवार ठरले देवदूत!

टीम लय भारी 

 कर्जत-जामखेड :  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) हे सोशल मीडियावर सक्रीय असतात.  कर्जत-जामखेड या मतदारसंघातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची ते दखल घेत असतात. रोहित पवार (Rohit pawar) यांनी फेसबुकवर प्रविण फुंदे या लहान मुलाविषयची पोस्ट शेअर केली आहे. Rohit pawar help farmers son

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील प्रविण फुंदे सांगली येथे ऊसतोडीला गेला होता. त्याच वेळी दुचाकी अपघातात चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यांच्या मेंदूलाही मार लागला होता. प्रविणच्या उपचारासाठी रोहित पवारांनी मदत केली. म्हणूनच त्या मुलाच्या वडिलांनी हरिदास फुंदे यांनी आग्रह करून त्यांना घरी बोलावलं. याच संर्दभातील पोस्ट रोहित पवारांनी शेअर केली आहे.

रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये असं म्हणतात की,

सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याकामी लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं.

घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला.

हे सुद्धा वाचा : 

देशात असलेल्या महागाईला केंद्र सरकार कारणीभूत राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून उपयोग नाही :  रोहित पवार

Former K’taka CM Kumaraswamy Slams Ajit Pawar’s ‘Immature’ Statements on Merging Border Areas with Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी