34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमोदी सरकार म्हणजे 'खोटं बोल पण रेटून बोल' : रोहित पवार

मोदी सरकार म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. भाजपा सरकारने स्वामिनाथन आयोग लागू केला असल्याचा भाजपचा दावा पूर्णतः खोटा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. स्वामिनाथन आयोगाच्या लागू करण्यात आलेल्या २०१ शिफारशीपैकी १७५ शिफारशी युपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या होत्या तर केवळ २५ शिफारशी भाजपा सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या. Rohit Pawar on Swaminathan Aayog

मोदी सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव देत असल्याचा गाजावाजा करत आहे. मात्र प्रत्यक्षात स्वामिनाथन आयोगाच्या C2 फॉर्म्युल्यावर आधारित हमीभाव न देता, A2+FL फॉर्म्युल्यावर आधारित हमीभाव देत आहे आणि हीच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची फसवणूक  केल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर केला आहे. Rohit Pawar on Swaminathan Aayog

शेतकरी आंदोलनादरम्यान हमीभावाला कायद्यात्मक आधार देण्याची आग्रही मागणी राहिली. केंद्र सरकारने भलेमोठे शेतकरी कायदे केले, परंतु या तीन कायद्यांमध्ये हमीभाव हा एकच शब्द टाकण्याची नियत मात्र केंद्र सरकारने दाखवली नाही.

उलट हमीभाव देणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पाच राज्यांच्या निवडणुका बघून हमीभावासंदर्भात समिती स्थापन करणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते, परंतु निवडणुका होताच सरकारला या समितीचा विसर पडला आहे असं म्हणत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपच्या सरकारला खडे बोल सुनावले आहे.

रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यातून त्यांनी मोदी सरकारने निवडणुकीच्या वेळी जी घोषणा केली यावर ही भाष्य केले. मोदी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं केंद्र २०१७ मध्ये सांगितलं, परंतु ही घोषणा देखील आज हवेतच विरली आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला ६००० रुपये देत आहे, मात्र खतांच्या, डिझेलच्या किमती दुपटीने वाढवून, ही मदत व्याजासकट वसूल करत आहे. एकूणच केंद्र सरकार शेतकऱ्याच्या प्रति आत्मीयता असल्याचा दिखावा करत असली तरी वास्तवात मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अडगळीत टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करतानाही ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही आपली सवय मात्र कायम ठेवली आहे. अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : 

राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होत आहे :  रोहित पवार

Maharashtra Election: “You Are NDTV 24×7, We Work 24×7”: Aaditya Thackeray Campaigns In Worli

मी पुन्हा कधीही येऊ शकणार नाही’ याची फडणवीसांना भीती : Atul Londhe

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी