राजकीयमहाराष्ट्रमुंबई

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक करा :  रुपाली चाकणकर

 दीपा चौहान असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार आहे. याचीच दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

टीम लय भारी 

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक करा :  रुपाली चाकणकर

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. गणेश नाईक यांच्या विरोधात एका पीडित महिलेने तक्रार दिली आहे. महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. Rupali Chakankar Arrest BJP MLA Ganesh Naik

 दीपा चौहान असं या महिलेचं नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार आहे. याचीच दाखल घेत  रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

दीपा यांनी माध्यमांशी बोलताना असं  म्हटलं की, माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय. पीडित महिलेची मागणी आहे की, त्यांची डीएनए टेस्ट करावी. मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहे.

हे सुद्धा वाचा:  

बंडातात्यांच्या विधानाने महिलांच्या स्वाभिमानाला धक्का , रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

Clashes after TRS workers stall T’gana BJP chief’s padayatra

गिरगाव चौपाटीवरील व्हिविंग गॅलरीचे लोकार्पण

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close