38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराजकीयरुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

टीम लय भारी

मुंबई :- उत्तरप्रदेश येथे महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाही. उत्तरप्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एका महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जाते. योगीच्या राज्यात सुरू असलेला भोगींचा सुळसुळाट भाजपच्या एकाही महिला नेत्याला दिसत नाही. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजप महिला नेत्यांवर केली आहे (Rupali Chakankar criticizes BJP women leaders).

उत्तरप्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपकडून हिंसाचार करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात आहे. इतकं सगळं होऊनही भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. यावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे. यात त्या म्हणाल्या की, योगीच्या राज्यात सुरू असलेला भोगींचा सुळसुळाट भाजपच्या एकाही महिला नेत्याला दिसत नाहिये का ? असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी भाजप महिला नेत्यांना केला आहे (Rupali Chakankar has asked this question to BJP women leaders).

हिंगोली येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

मनपावर मराठीसह हिंदुत्वाच्या मुद्याने भाजपचा झेंडा फडकवणार – आशिष शेलार

उत्तरप्रदेश येथे महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी चंदौली जिल्ह्यातील बर्थरा गावात दलित महिलेच्या घराला आग लावली होती. त्यांनतर आता महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटनेवरून सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात आहे.

Rupali Chakankar criticizes BJP women leaders
रूपाली चाकणकर

माळशिरसची एनसीपी कार्यकारणी बरखास्त; उत्तम जानकरांनी पक्षाकडे केली होती तक्रार

Uttar Pradesh draft bill proposes to bar people with over two children from getting govt jobs

या हिंसाचारावरून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये महिलांवर इतके अत्याचार होत आहेत. पण असं असताना भाजपच्या राष्ट्रीय नेत्या मंत्री स्मृती इराणी, निर्मला सीतारमण आणि भाजप महिला मोर्च्याच्या प्रमुख वनाथी श्रीनिवासन, ह्या उत्तरप्रदेश मधील महिला अत्याचारांच्या घटनेवर बोलायला तयार नाहीत. जून महिन्यात ममता बनर्जी यांच्यावर महिला अत्याचाराच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या स्मृती इराणी आता उत्तरप्रदेश मधील घटनांवर का बोलत नाही? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी