मनोरंजनमहाराष्ट्र

रुपाली चाकणकरांची मुलासाठी भावनिक पोस्ट!

  'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातून रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याहस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

टीम लय भारी 

रुपाली चाकणकरांची मुलासाठी भावनिक पोस्ट!

मुंबई:  ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘तू आणि मी, मी आणि तू’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातून रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याहस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुलगा सोहम करीता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. Rupali Chakankar emotional post for son

सोहम,आज तुझा वाढदिवस,आज तुझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले,त्यावेळी मी समोर बसले होते आणि तु मिडियासमोर बोलत होता,तुला माझ्याबद्दल प्रश्न विचारला,उत्तर देताना तुझे भरुन आलेले डोळे पाहुन माझ्याही कडा ओल्या झाल्या. Rupali Chakankar emotional post for son

वीस वर्षापुर्वी सोहम माझ्या कडेवरुन जग पाहत होता,आता स्वतःचेच नवे जग तयार केले .तुझ्या चित्रपट क्षेत्रातील या विश्वात तुला अफाट यश मिळू दे,उत्कृष्ट अभिनेता होशील ही खात्री आहे. पण उत्कृष्ट माणुस नक्की होशील हा दृढ विश्वास आहे कारण तु माझ्या गर्भात वाढला आहे.

तुझ्या सर्व स्वप्नांना गरुडाचे पंख मिळू देत ,जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घाल ,माझं आयुष्य मिळू दे माझ्या बाळाला हि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

निर्माते – राजू तोड़साम, ऋषभ कोठारी व सागर जैन निर्मित – जैन फिल्म प्रोडक्शन आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून सोहम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

हे सुद्ध वाचा: 

मराठी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्रीचे थेट बॉलिवूडच्या विश्वात पदार्पण

“Everyone Has To Think About Themselves”: Kapil Sibal On Quitting Congress

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close