29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयबंडातात्यांच्या विधानाने महिलांच्या स्वाभिमानाला धक्का , रुपाली चाकणकर

बंडातात्यांच्या विधानाने महिलांच्या स्वाभिमानाला धक्का , रुपाली चाकणकर

टीम लय भारी

पुणे:- ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली आहे. महिला आयोग कार्यकर्त्यांनी पुण्यात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात आज आंदोलन केले आहे.( Rupali Chakankar, women’s self-esteem hit by rebel statement)

बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे  आणि पंकजा मुंडे  यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही वेळापुर्वीच त्यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

अजून तरी माझे मानसिक संतुलन ढासळले नाही ,अमृता फडणवीस

नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर शिवसेनेकडून आली पहिली प्रतिक्रिया

Objectionable remarks: Maharashtra women’s commission urges action against Karadkar

त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर  यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. बंडातात्या कराडकर यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानाला, स्वाभिमानाला धक्का देणारे असून अतिशय संतापजनक वक्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गळ्यात माळ आणि कपाळावर टीळा लावून असे आक्षेपार्ह वक्तव्य अतिशय धक्कादायक असून त्यांनी वारकरी संप्रदायाचाही अपमान केला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणालाही अधिकार नसतो. मात्र बंडातात्या कराडकर यांनी स्थानीक आमदार, नेते यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी, दोन दिवसांत त्यांनी लेखी अहवाल द्यावा. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल,असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

तसेच बंडातात्या कराडकर यांनी कोरोनाचे सर्व नियम मोडत, जमाव गोळा केला. त्यांच्यावर राज्यभरातून तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार सातारा पोलिसांना त्यांच्याविरोधात कडक कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल ४८ तासांत महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी  प्रतिक्रिया दिली आहे. स्त्रियांनी आपल्या देशात खूप भोगलेलं आहे. त्यांच्यावर टीप्पणी करणं चुकीचं वाटतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. कधीही कोणावर वैयक्तिक टिप्पणी करू नये. दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला. वैयक्तीक टिप्पणी कोणावरही व्हायला नको. महाराष्ट्रात नेहमीच कोणी बोलल्यावर आंदोलन होतात. स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. पण, आपल्याला मानसिकता बदलायची आहे, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी