32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनमास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

टीम लय भारी

मुंबई : क्रिकेटचा गॉड फादर अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट विश्वातला खेळाडू म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) ओळख आहे. सचिनच्या क्रिकेट बाबतीतील चर्चा या सर्वत्र सुरु असतात. त्यातच आता सचिन तेंडूलकरची मुलगी सारा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराला चित्रपटांमध्ये खूप रस आहे आणि तिला तिचं करिअर ग्लॅमरच्या दुनियेत करायचं आहे. साराने मॉडेलिंगसह अॅक्टींग सुद्धा शिकून घेतलं आहे. (Sachin Tendulkar daughter makes her Bollywood debut)

साराने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे.साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. ती 24 वर्षांची आहे. सारा तेंडुलकरचे (Sachin Tendulkar daughter makes her Bollywood debut) तिच्या Instagram अकाउंटवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, रणवीर सिंग, सारा अली खान, आलिया भट्ट आणि इतर अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सारा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

साराचं नाव भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. दोघेही काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा सारा आणि शुभमन या दोघांनीही त्यांच्या फोटोंमध्ये एकच कॅप्शन टाकले होते.

सारा खूप टॅलेंटेड आहे आणि तिला तिच्या करिअरसाठी आई-वडीलांचा पाठिंबा आहे. सचिनची मुलगी साराच्या अभिनयाच्या कौशल्याबाबत अनेकांना त्याची माहिती नाही. मागील काही वर्षांपूर्वी सारा तेंडुलकर अभिनेता शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यावेळी सचिन म्हणाला होता की, “सारा सध्या शिक्षण घेत आहे. सध्या तरी तिचा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा कोणताच विचार नाही, परंतु बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या बातमीने ती नाराज झाली आहे.” मात्र आता पुन्हा सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)


हे सुद्धा वाचा : 

सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

FightToCorona : सचिन तेंडूलकरने ठाकरे पिता – पुत्रांचे केले कौतुक

ईदच्या पार्श्वभूमीवर समाज विघातक व्यक्तींवर करडी नजर ठेवा, वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

Sachin Tendulkar’s Daughter Sara Tendulkar Is Reportedly Gearing Up For Her Bollywood Debu

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी