30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयसंजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येण्याची शक्यता

संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : एका युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा मंत्रीमंडळात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी पोहरादेवीच्या महंतांनी आज थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान देणार असल्याचा शब्द दिल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी संजय राठोड यांचे प्रकरण गाजले होते. एका मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातून मोठया प्रमाणात विरोध झाला. संजय राठोडांना मंत्रीमंडळाचा राजीनामा दयावा लागला. या प्रकरणात ते दोषी नाहीत असे पोलिसांच्या चैकशी अहवालात समोर आले आहे. त्यानंतर पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, ऍड. अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. समाजाच्या भावना लक्षात घेवून त्यांनी मंत्रिमंडळात विस्तारात त्यांना स्थान देण्याचा शब्द उध्दव ठाकरेंनी दिल्याचे सांगितले. पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता काम नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

हे सुद्धा वाचा :

माझ्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील; संजय राठोड

बांठीया आयोगामधील त्रुटी दूर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आश्वासन

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी