31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयगंगेत प्रेतं वाहून गेली तसे हे भाजप सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल :...

गंगेत प्रेतं वाहून गेली तसे हे भाजप सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई:  शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)  यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या ‘मसणात जाईल’ या विधानाचा उल्लेख राऊतांनी भाजपसाठी केले आहे. राऊतांनी सध्या देशात जे राजकारण केले जात आहे त्यावर भाष्य केले आहे. या लेखाच्या माध्यमातून राऊतांनी (sanjay raut) काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थितीत केले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर ईडीची जी कारवाई होतं आहे, त्यावर राऊत म्हणतता, ईडी, सीबीआयचे महाराष्ट्रासारख्या राज्यांतील छापे हा आता गमतीचा विषय बनला आहे.  sanjay raut criticize modi govt

समुद्रात सांडपाणी सोडले या सबबीखाली देशातील आर्थिक घोटाळ्यांचा तपास करणारी ईडीसारखी यंत्रणा छापेमारी करते. याला राज्य चालवणे असे म्हणत नाही. अनिल देशमुख यांच्यावर दोनशेच्या वर छापेमारी करून काय मिळवले? नवाब मलिक यांच्या बाबतीतही ‘वडाची साल पिंपळाला चिकटवण्याचेच काम सुरू आहे. परबांचे ‘सांडपाणी’ हे तर वेगळेच प्रकरण आहे. हे असेच चालू राहिले तर गंगेत प्रेते वाहून गेली तसे है सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल. चंद्रकांत पाटलांच्या भाषेत मसणात जाईल’, हे लिहून ठेवा!

आपल्या देशातील तपास यंत्रणा व न्यायव्यवस्थेवर जागतिक पातळीवर संशोधन करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या रोज ‘ऐकावे ते नवलच!’ अशी इसापछाप प्रकरणे समोर येत आहेत. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून ‘ईडी’ नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची 12 तास चौकशी केली. गेले काही दिवस, नव्हे काही महिने दापोलीतील साई रिसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले. परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्याकडून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना ‘टार्गेट’ केले जात आहे हे आता स्पष्टच दिसते.

ईडीची बारा तासांची छापेमारी संपल्यावर परब पत्रकारांना सामोरे गेले व म्हणाले ‘ज्या रिसॉर्ट प्रकरणावरून माझ्यावर छापेमारी केली ते माझे नाही. माझे मित्र कदम यांचे आहे. रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी जाते असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण विभागाने दाखल करून ईडीने मला लक्ष्य केले. यात तुमचे ते मनी लॉण्डरिंग वगैरेचा विषय येतोच कोठे?” परब यांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिसॉर्ट अद्याप सुरूच झाले नाही, मग सांडपाणी समुद्रात जाईलच कसे? रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे, असं लेखात म्हटलं आहे.

अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा मुंबईत दणक्यात होणार, गणेश हाके यांचा पुढाकार (जाहीरात)

गंगेत प्रेतं वाहून गेली तसे हे भाजप सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल : संजय राऊत

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे सुद्धा वाचा: 

मुंबईत प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार

“If India Belongs To Anyone, It’s Dravidians, Adivasis”: Asaduddin Owaisi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी