32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमुंबईज्यांनी बाळासाहेबांना सोडले, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, त्यांनी आम्हाला शिकवू नये :...

ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, त्यांनी आम्हाला शिकवू नये : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई: राज्यात भोंग्यावर आंदोलन व्हावे अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. राज ठाकरे यांनी ट्विट करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप शेअर केली आहे. मनसेने या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला होता.  यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबात उपवस्त्र म्हणून राहत आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे. या देश सगळ्यात जास्त आंदोलने शिवसेने केली आहे. आंदोलन कशी करायची हे शिवसेने कडून शिकलं पाहिजे. शिवसेना गेली 50 वर्षे आंदोलन करत आहे. काही लोक राजकारणात हवशे नवशे गवशे असतात, असल्याचा टोला राऊत यांनी मनसेला लगावला. शिवसेनेला हिंदूत्त्व शिकवू नये. कुणाच्याही अल्टिमेटमवर सरकार चालणार नाही, असेहीसंजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा: 

बायकांच्या आडून करण्यात येणारे शिखंडीचे उद्योग भाजपने बंद करावे : संजय राऊतांचा घणाघात

Raj Thackeray Party Workers Detained Outside His Mumbai Home

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी