34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeटॉप न्यूजसंत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये

संत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये

 टीम लय भारी

मुंबई- महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी संत साहित्य संमेलन घेतले जाते. यावर्षी हे संमेलन रायगड जिल्ह्यातील खालापुरात होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.( Sant Sahitya Sammelan from tomorrow in Raigad)

या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे आहे. तसेच संमेलनाध्यक्षपद ह. भ. प. आचार्य बाळासाहेब महाराज देहूकर भूषविणार आहेत. संमेलनाच्या सांगता समारंभाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिर्डीत विश्वस्त मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय

तर महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होऊ शकतात; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून इशारा

लॉकडाऊननंतर अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर प्रथमच उघडले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी

Maharashtra minister Balasaheb Thorat tests positive of Covid-19

समाजमनाची दुरुस्ती आणि सुशिक्षित, सुसंस्कृत मनाने माणसं एकत्र राहण्याची मानवतावादी शिकवण देणाऱ्या वारकरी संत परंपरेचे दहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हॉटेल नोव्हाटेल ईमॅजिका, सांगडेवाडी, खालापूर जि. रायगड येथे २२ व २३ जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनादरम्यान साधुपरंपरा व संत परंपरा त्याचबरोबर संत नामदेवांची सामाजिक भूमिका व महिला संतपरंपरा या तीन प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे यांनी दिली.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन दिवसीय कार्यक्रमात प्रशासनातील संत परंपरेला मानणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहून परिसंवादात सहभागही घेणार आहेत. राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेध सिंगल, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अन्य सनदी अधिकारी सहभागी होणार आहेत.

राज्याच्या कारभाराला दिशा देण्याची जबाबदारी असणारे प्रशासनातील कर्तेधर्ते अधिकारी या संमेलनात प्रबोधन करणार आहेत. कोरोनामुळे माणसं माणसांपासून दूर गेली असताना व सर्वत्र एक अनामिक नकारात्मक वातावरण असताना संत संमेलनाचा हा सामाजिक सोहळा होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी