28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंविरोधात संतोष बांगर यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

उद्धव ठाकरेंविरोधात संतोष बांगर यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

टीम लय भारी

मुंबई : हिंगोली जिल्हाप्रमुख आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आज (दि. १२ जुलै २०२२) मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी संतोष बांगर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी संतोष बांगर यांनी त्यांच्या समर्थकांना मार्गदर्शन सुद्धा केले.

राज्यातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर संतोष बांगर ढसाढसा रडले होते. त्यांनी बंडखोरांना पक्षात पुन्हा येण्याचे आवाहन सुद्धा केले. परंतु संतोष बांगर यांनी सुद्धा बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला. जो आधी ढसाढसा रडला, नंतर तोच त्यांना जाऊन मिळाला असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना पक्षाकडून कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे संतापलेल्या संतोष बांगर यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यानुसार ते आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबई येथे दाखल झाले. गाड्यांचा ताफा घेऊन जाताना सुद्धा संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन केले.

या शक्ती प्रदर्शनावेळी संतोष बांगर यांच्या समर्थकांनी घोषणा देखील दिल्या. ‘संतोष बांगर आगे बढो, हम तुम्हारे साथ है..’, ‘कोण आला रे कोण आला.. शिवसेनेचा वाघ आला..’ तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशाही घोषणा यावेळी समर्थकांकडून देण्यात आल्या. दरम्यान, या शक्ती प्रदर्शनात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

हे सुद्धा वाचा :

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र

राजकीय पक्षांना चपराक; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी