28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्र'ते' वेळेत पोहोचले नाही... तर 'ते' रुसतात, असेही अनोखे प्रेम

‘ते’ वेळेत पोहोचले नाही… तर ‘ते’ रुसतात, असेही अनोखे प्रेम

लय भारी टीम

नागपूर : मुक्या प्राण्यांना जीव लावला की ते सुद्धा आपल्यावर भरभरून प्रेम करतात, जवळ येऊन आनंद व्यक्त करतात, असेच काहीसे चित्र नागपूर येथील अंबाझरी उद्यानात पाहायला मिळाले. सत्पुरुष वानखेडे गेल्या 20 वर्षांपासून नियमितपणे अंबाझरी उद्यानात जातात आणि तेथील पशुपक्षांवर माया करतात. तेथील पशुपक्षी देखील त्यांच्या अंगाखांद्यावर बागडून गुजगोष्टी करताना दिसतात. वानखेडे यांचे हे अनोखे प्रेम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

तरुण भारत वृत्तपत्राचे पत्रकार शेलेष भोयर यांनी हि स्टोरी कव्हर केली असून त्यांचे मित्र @Pktakey यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही स्टोरी समोर आणली आहे. टाके यांनी हे अनोखेपण ओळखून सत्पुरुष वानखेडे यांचा पशुपक्षांसोबत हितगूज करत असतानाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या ट्विटर पोस्टमध्ये शेअर केला आहे.

टाके ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, “ते वेळेत पोहोचले नाही.तर ते रुसतात.पक्षी त्यांच्याशी गुजगोष्टीही करतात. गेल्या 20 वर्षापासून सत्पुरुष वानखेडे नियमित अंबाझरी गार्डनमध्ये पशुपक्षांवर अशी माया करतात. निसर्गाशी समरस वानखेडेंचे पक्षी प्रेम असे अनुकरणीय.तरूण भारतचे पत्रकार मित्र शेलेष भोयर यांची हटके स्टोरी” असे म्हणून हे अनोखेपण नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहे.

नेटकऱ्यांनी सुद्धा या स्टोरीला प्रचंड प्रतिसाद देत हजारो लाईक्सचा पाऊस पाडून रीट्विट्स सुद्धा केले आहेत.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

VIDEO : विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भावुक

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी