राजकीयमहाराष्ट्र

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

काही करुन थोरात यांना आपल्या घरी बोलवण्याचा निश्चय माझा युवक काँग्रेसच्या काळापासूनचा एक सहकारी सरफरोज शेख म्हणजेच सरूला याने केला आणि थोरात यांना घरी बोलावले. ही संपूर्ण घटना सरुला यांच्या आयुष्यातील आनंददायी घटना होती. त्यामुळे या घटनेमुळे सरुला यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या संपूर्ण घटनेची पोस्ट लिखित स्वरुपात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे  यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

टीम लय भारी

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

मुंबई : काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या फेसबुक पोस्टची नेहमीच चर्चा असते. नुकतंच त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. माजी गृहराज्यमंत्री व अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे साहेबांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमानिमित्त थोरात साहेब सोलापूर दौऱ्यावर होते. ही बाब थोरात यांच्या एका कॉंग्रेसच्या सहकाऱ्याला समजली. त्यावेळेस काही करुन थोरात यांना आपल्या घरी बोलवण्याचा निश्चय माझा युवक काँग्रेसच्या काळापासूनचा एक सहकारी सरफरोज शेख म्हणजेच सरूला याने केला आणि थोरात यांना घरी बोलावले. ही संपूर्ण घटना सरुला यांच्या आयुष्यातील आनंददायी घटना होती. त्यामुळे या घटनेमुळे सरुला यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या संपूर्ण घटनेची पोस्ट लिखित स्वरुपात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. (Satyajeet Tambe’s Facebook post on Balasaheb Thorat)

काय आहे सत्यजित तांबे यांची पोस्ट ?

ही गोष्ट माझा युवक काँग्रेसच्या काळापासूनचा एक सहकारी सरफरोज शेख म्हणजेच सरूला समजली. त्याने तातडीने थेट  थोरात साहेबांची भेट घेतली आणि त्याच्या घरी येण्याची विनंती केली. “साहेब, तुम्ही माझ्या घराच्या समोरून जाताय, ५ मिनिटं का होईना तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. मी आपल्याच परिवाराचा सदस्य आहे. सत्यजीत दादांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत.” असा प्रेमळ आग्रह त्याने केला. कार्यकर्त्यांच्या बाबतीत नेहमीच जिव्हाळा जपणाऱ्या साहेबांना काही त्याचा आग्रह मोडण्याची इच्छा होईना ! त्यामुळे त्याच्या विनंतीला मान देत साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरी भेट दिली आणि त्याच्या आदरातिथ्याचा प्रेमाने स्वीकार केला असल्याचे तांबे (Satyajeet Tambe) यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरू हा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील एका सामान्य व अतिशय गरीब परिवारातील मुलगा आणि मनात काँग्रेसप्रेम अगदी काठोकाठ भरलेला एक अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता ! विशेष म्हणजे तो धर्माने मुस्लिम असला तरीही त्याची अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा आहे. कोणताही सण, उत्सव असो, स्वामींच्या सेवेत तो अगदी मनोभावे सहभागी होतो. मी, माझे कुटुंबीय किंवा मित्रपरिवारापैकी कोणीही अक्कलकोटला जाते तेव्हा सरू तिथे कायम हजर असतो. काय हवं नको ते अगदी आपुलकीने बघत असतो. इतकंच नाही, तर आमच्या परिवाराच्या दृष्टीने जे महत्त्वाचे दिवस आहेत, म्हणजे एखाद्याचा वाढदिवस किंवा अन्य कोणताही एखादा महत्त्वाचा, आनंदाचा दिवस असो त्या दिवशी तो मुद्दामहून श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो आणि स्वामींना अभिषेक करतो. त्याचे फोटो किंवा व्हिडीओ पाठवायलाही तो विसरत नाही. आमच्या परिवारावरील प्रेम अशा पद्धतीने तो सातत्याने जपत असतो, असे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी लिहिले आहे.

अशा या आमच्या सरूच्या घरी स्वतः थोरात साहेबांनी भेट दिल्यामुळे अर्थातच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पक्ष संघटनेच्या तळाशी राहून पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे असे सच्चे कार्यकर्ते हे काँग्रेसचं खरं धन आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांची कदर करण्याचा बाळासाहेब थोरात साहेबांचा हा गुण माझ्यासाठी नेहमीच अनुकरणीय राहिलेला आहे, असे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी लिहिले आहे.


हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Maharashtra revenue minister Balasaheb Thorat to meet IGR on 10,500 illegal registration

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close