34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र ठाकरे कुटुंबातील लोक वाचतात नसावेत – शरद...

आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र ठाकरे कुटुंबातील लोक वाचतात नसावेत – शरद पवार

टीम लय भारी 

मुंबई: राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं की फुले, आंबेडकर शाहुंचा उल्लेख केला जातो त्याचा मला अभिमान आहे. Sharad pawar answers raj thackeray

माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली आहे. गैरफायदा घेणार्‍याला ठोकून काढण्याचे काम केले आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्र सविस्तरपणे कोणी लिहिलं असेल तर फुलेंनी लिहिलं आहे. महाराजांचा कसा आदर्श घेऊन कशाप्रकारे करावा हे या तिघांनी मांडलं आहे, असं पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख त्यांनी केला. पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं.

खुपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होता.

तेव्हाही होता आणि आता ही विरोध आहे. या लिखाणाला मी उघडपणे विरोध केला त्याचा मला अभिमान आहे. त्यांनीही कधी यासंदर्भात खुलासा केला नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असं पवार म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख नव्हता. भाषणात सर्वसामान्यांचा उल्लेख नव्हता. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी या सर्व आरोपांवर उत्तर दिली.

हे सुध्दा वाचा: 

धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : शरद पवार

‘It’s time to speak on inflation, unemployment but no one speaks on it’: Sharad Pawad plays down Raj Thackeray’s loudspeaker warning

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष! 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी