28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशरद पवारांची मोदींवर खोचक टीका, अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत

शरद पवारांची मोदींवर खोचक टीका, अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत

टीम लय भारी

पुणे: ६ मार्च रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशनपर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांवर शरसंधान साधले आहे.(Sharad Pawar sharply criticizes Modi)

युक्रेन हा अतिशय सुंदर देश. आपल्या इथे मेडिकलसाठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थी तिथे जातात.  रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.  मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय.  केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.  पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे.

युक्रेनमधे कमी फीमध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. इथे 95 टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे 60 टक्क्यांना प्रवेश मिळतो. आज ही हजारो मुलं अडकली आहेत. जीव मुठीत धरुन ती तिथे आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत, असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

टाउनशिप उभारण्याचा निर्णय योग्य होता, शरद पवार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांना कोरोनाची लागण

Twitter locks Law Beat’s account, editor claims action taken for covering Bombay HC order against NCP chief Sharad Pawar

मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडकवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे, असेही शरद पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी