30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांचे निकटवर्तीय 'प्रफुल्ल पटेलां'ना ईडीचा जोरदार धक्का

शरद पवारांचे निकटवर्तीय ‘प्रफुल्ल पटेलां’ना ईडीचा जोरदार धक्का

टीम लय भारी

मुंबईः राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीचे राज्यातील धाडसत्र कायम आहे. ईडीने आता राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केले आहे. पटेल यांच्या इमारतीतील 2 मजले जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील वरळी इथे प्रफुल्ल पटेल यांची ‘सीजे हाऊस’ नावाची मोठी इमारत आहे. इमारतीच्या बांधकामाआधी त्याजागी छोटी इमारत होती. ती इमारत इक्बाल मिर्चीच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली. पुनर्बांधणीच्या मोबदल्यात पटेल यांनी मिर्चीला रक्कम आणि जागा दिली असल्याचं ईडीने सांगितले.

या सर्व व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणात ईडीकडून सर्व तपास सुरु आहे. पटेल यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत.  प्रफुल्ल पटेल चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहे. राज्यसभा सदस्य देखील आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत.

हे सुध्दा वाचा:

‘द्रौपदी मुर्मू’ यांचा विजय निश्चित; निकाल लागण्यापूर्वीच देशभरात जल्लोष

विदर्भात ‘तिबार पेरणी‘चे संकट

VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी