मनोरंजन

पावनखिंड नंतर शेर शिवराज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ बॉलिवूड अभिनेता साकारणार अफझल खानची भूमिका

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांनतर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शेर शिवाजी’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

टीम लय भारी

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांनतर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शेर शिवाजी’ (Sher Shivraj)असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटचं धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ( Sher Shivraj Movie Release On 22 April)

पावनखिंड नंतर शेर शिवराज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार अफझल खानची भूमिका

अभिनेता चिन्मय मांडलेकर हा ‘शेर शिवराज’  (Sher Shivraj) या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफझल खानाची भूमिका साकारणार आहेत. ‘शिवराज अष्टक’ सीरिजमधील आजवरच्या सर्व सिनेमांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. यातील प्रत्येक भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्या आहेत.

शिवकालीन इतिहासातील सोनेरी पान

‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या (Sher Shivraj) युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे.

हे सुद्धा वाचा : 

‘Sher Shivraj’ trailer: Chinmay Mandlekar and Mukesh Rishi stand out with their performances in the period drama

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची नाराजी दूर?

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close