33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयशिंदे - फडणवीस सरकारचा लवकरच होणार शपथविधी

शिंदे – फडणवीस सरकारचा लवकरच होणार शपथविधी

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंडाची नीती वापरून शिवसेनेलाच शह देत भाजपसोबत एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारला ‘नैसर्गिक’ उपमा देत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर या नव्या नैसर्गिक सरकारचे मंत्रिमंडळ कसे असेल याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असताना मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख सूत्रांकडून कळवण्यात आली आहे.

शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कोणाला कोणते खाते मिळणार, शिंदे गटातील कोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी पाच नेते यावेळी मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. यावेळी शिंदे गटाकडून 20 मंत्रीपदाची मागणी करण्यात आली असून त्यांना केवळ 15 खाते मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन बारा दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे सामान्यांच्या समस्या वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच नेमकी दाद कुठे मागावी असा प्रश्न आतापर्यंत जनसामान्यांना कासावीस करीत होता परंतु मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख  समोर आल्याने सगळ्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

कर्मठ पुरूषी विचारांना चपराक; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

नंदुरबारमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे लाखो रुपयांचे साहित्य भंगारात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी