30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईकोर्टाच्या सूनावणीपूर्वी, शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकरणी जाहीर

कोर्टाच्या सूनावणीपूर्वी, शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकरणी जाहीर

टीम लय भारी

मुंबई: शिंदेगटाची नवी राष्ट्रीय कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाने जुनी कार्यकारणी बरखास्त केली आहे. मुख्य नेते पदी एकनाथ शिंदे तर उपनेतेपदी अनेक नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर दिपक केसरकरांची प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

शिवसेनेच्या उपनेतेपदी उदय सामंत, यशवंत जाधव, रामदास कदम, असूळ, तानाजी सावंत, विजय नहाटा, गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. दोनच दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या सुनावणीपुर्वीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. भजाप हा पक्ष शिवसेनेच्या आधाराने मोठा झाला. इतर पक्षांचे खच्चीकरण करणे, हाच भाजपचा अजिंठा आहे. भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने वाढवले.’ मी राज्य पाहिन तुम्ही राष्ट्र पहा’ असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते. मात्र भाजपने चाणक्य नितीने नव्हे तर कपट नितीने शिवसेना संपवण्याचा डाव आखला. हे बंडखोरांच्या लक्षात आले नाही असे नागरिकांना देखील वाटते आहे.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेचे 14 खासदार शिंदेगटाच्या वाटेवर

साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

एकनाथ शिंदेंची जादू कायम; रामदास कदमांचा राजीनामा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी