33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईशिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शिवसेनेच्या पक्षाला मोठे भगदाड पडल्यानंतर शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाच्या परिसरात येथे एकत्रित येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी शिवसेनेच्या रणरागिनींनी गद्दारी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना शाप देखील दिला.

शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनात उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सांगितले. तर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाचे आणि असंतोषाचे वातावरण देखील या शक्तिप्रदर्शनावेळी पाहायला मिळाले. सेना भवनाच्या बाहेर शिवसैनिकांसोबतच नगरसेवक सदा सरवणकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील शिवसैनिकांसोबत मिळून घोषणाबाजी केली.

यावेळी काही महिला शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त करत गद्दारी केलेल्या सेनेच्या आमदारांना शाप देखील दिला. जे शिवसेनेसोबत गद्दारी करतात, त्यांचे कधीच चांगले होत नाही. ते सुखी राहत नाही, अशा शब्दात महिला शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. आम्ही शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या सोबत आहोत. साहेब तुम्ही आम्हाला कधीही आवाज द्या, आम्ही धावत येऊ.. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

आज चार गेले तरी, उद्या १० उभे राहतील उद्धवसाहेबांनी आदेश दिल्यावर जे काही आहे ते आम्ही शिवसैनिक करणार. हे जे कोणी केले आहे त्यांना त्याची फळं भोगावी लागणार. शेवटी त्यांना मुंबईमध्ये यायचं आहे त्यांना आम्ही शिवसैनिक बघून घेऊ, अशा धमकीवजा शब्दांत शिवसैनिकांनी बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुनावले आहे.

हे सुद्धा वाचा :

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !

‘त्या’ आमदारांच्या जीवाला धोका

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी