28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईशिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या हुतात्मा चौकात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्च्याल‍ा द.मुंबईतील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात हजर होते. महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. यावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेनेचे उपनेते रविंद्र मर्लेकर, उपनेत्या मिनाताई कांबळे, राजकुमार बाफना, विभाग प्रमुख पांडूरंग सकपाळ तसेच शिवसेना महिला विभाग संघटक जयश्री बल्लीकर आदी उपस्थित होते.

आज मुंबईतील हुतात्मा चौक शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. “चले जाव चले जाव‍ भगतसिंह कोश्यारी चले जाव”, काय ते धोतर, काय ती काळी टोपी, काय त्याच भाषण, असे घोषणांचे फलक हातात घेवून, शिवसैनिकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी मुंबईतील गुजराती, मारवाडी, जैन समाजातील शिवसैनिकांनी देखील हजेरी लावली होती. मुंबई आमच्या बापाची नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची आशी घोषणाबाजी केली. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी मोर्च्याला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या राज्यातील किल्ले विख्यात आहेत. देवस्थानं विख्यात आहेत. पदार्थ विख्यात आहेत. ‍कोल्हापूरी चप्पल देखील विख्यात आहे. यावेळी त्यांनी संजय राउतांवर पडलेल्या ईडीच्या धाडीचा देखील उल्लेख केला.

यावेळी ते असेही म्हणाले की, शिवसेनेचं चिन्हं हे शिवसैनिकांच्या मनात आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ आता शाखे शाखेवर देखील निदर्शने केली जाणार आहेत. कधी कधी बरं असं संकटं आली की, आपण पेटून उठतो. मला मारवाडी गुजराती लोकांचे फोन आले. ते म्हणतात, आमचं गाव आम्हाला माहित नाही, आमचं गाव मुंबई आहे. पुन्हा एकदा “चले जाव”ची चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे” का हा लोकमान्य टिळकांनी विचारलेला प्रश्न पुन्हा विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केला. मराठी माणसांच्या अस्मितेचा अपमान केला. राजभवन म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्यांनी त्यांनी मीडियावर देखील ताशेरे ओढले. अर्जून खोतकर काल “रडत रडत” सेनेतून बाघेर गेले. त्याचे कारण त्यांनी सांगितले की, ते लोक आमच्या कुटुंबाला त्रास देतात. छळ करतात.

शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही. भूगोल माहित नाही. ते बोलता.  संजय पांडेवर कारवाई झाली कारण ते तुमचं ऐकतं नाही. आशा प्रकारे भाजपच्या सुडबुध्दीने चाललेल्या राजकारणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले की,आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून राज्यपाल भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व भाजप करत आहे.

यावेळी शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी देखील भाषण केले. ते म्हणाले की, आपण काळया टोपीचा निषेध करण्यासाठी जमलो आहोत. नुसती टोपीच नाही तर त्यांचा मेंदू देखील काळा आहे. त्यांच्या मुखातून चांगली वाणी कधीच आली नाही. कोश्यारी यांना सांगण्याची गरज आहे की, मराठी मुंबईला मोठं करण्यात मराठी माणसांचा मोठा वाटा आहे.

हे सुध्दा वाचा :

राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी आज ईडी कारवाईचा मुहुर्त, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे – संजय शिरसाठ

राज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी