29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांचे सोशल मीडियात जोरदार ‘कॅम्पेन‘!

एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांचे सोशल मीडियात जोरदार ‘कॅम्पेन‘!

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या नाट्याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले आहेत. लोक मिम्मचा देखील आनंद घेत आहेत. अनेक सच्च्या शिवसैनिकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. शिवसैनिक उध्दव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. सोशल मीडियावर शिवसैनिकांचे पोस्टर झळकले आहेत.वेगवेगळया पध्दतीने लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. त्यात काही निष्ठावान शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेवर ताशेरे ओढले आहेत.

‘ गेलेत ते 37 आहेत‘ इथे करोडो शिवसैनिक उध्दव साहेबांसोबत आहेत. अखेरपर्यंत शिवसैनिकच, आधी सूरत आता गुवाहाटी स्वाभिमान विकून खाल्ली माती, होय, शिवसेना, शिवसैनिकांचीच.

आमची महाशक्ती म्हणजे फक्त शिवशक्ती, होय.शिवसेना शिवसैनिकांचीच.

घेवूनी हाती भगवा गददारांना जागा दाखवा, होय, शिवसेना शिवसैनिकांचीच.

आमदारांवर टाकाल डाका, पण विकली जाणार नाही. इथल्या रस्त्यांवरची शाखा, होय, शिवसेना शिसैनिकांचीच.

विधिमंडळात नाही. ‘सरकार‘ आमच्या हृदयात आहे. होय, शिवसेना शिवसैनिकांचीच.

तुम्ही ‘नाथ‘बदलला. शिवसैनिकांनी नाही. होय, शिवसेना शिवसैनिकांचीच.

आशा प्रकारे शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना सोशल मीडियावर पाठीबा दर्शवला आहे. धीर दिला आहे.

 

 

हे सुध्दा वाचा: मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट

भाजपाचा ‘साळसूद‘ पणचा आव

फुटीर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन !

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी