29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीय‘शिवसेना – बाळासाहेब गटा’ला कायदेशीर मान्यता नसल्याने तो अर्थहीन : अशोक चव्हाण

‘शिवसेना – बाळासाहेब गटा’ला कायदेशीर मान्यता नसल्याने तो अर्थहीन : अशोक चव्हाण

टीम लय भारी

मुंबई : बंडखोर आमदारांनी स्वतंत्र गट स्थापून त्याला वेगळे नाव दिले आहे. परंतु जोपर्यंत कायदेशीर मान्यता मिळत नाही, तोपर्यंत अशा गटाला काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडून अशा गटाच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल ते पाहणे महत्वाचे आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. आमदारांनी बंडखोरी केली. त्यांनी शिवसेनेसोबत निष्ठा ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे शिवसैनिक व स्थानिक जनता नाराज आहे. आमदारांनी फसविल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. त्यातून स्थानिक पातळीवर काही घटना घडलेल्या असू शकतील. पण त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही सन २०१९ मध्ये ‘महाविकास आघाडी सरकार’ स्थापन केले होते. आम्ही तिन्ही पक्ष आजही एकत्र आहोत. शिवसेनेत जे काही सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळत आहेत.

हे सुद्धा वाचा :

‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी