30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयलाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो...

लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो…

टीम लय भारी 

मुंबई: भाजपने मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली. बाबरी मशीद पाडताना मी तिथेच होतो. अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं (Devendra fadnavis) दिवस घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलं आहे. Shiv Sena criticised Devendra fadnavis

मात्र आता या विधानाचा शिवसेने (Shiv Sena) चांगलाच समाचार घेतला आहे. औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो सोबत त्यांनी कॅप्शन दिलं की,  “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता असं म्हणत दानवे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो...

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांना या प्रकरणावर उत्तर दिलंय. शिवसेनेचे नेते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असं राऊत यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.

हे सुद्धा वाचा : 

बायकांच्या आडून करण्यात येणारे शिखंडीचे उद्योग भाजपने बंद करावे : संजय राऊतांचा घणाघात

Babri as ‘certificate’: Fadnavis says no Shiv Sena, ‘I was there to bring down mosque’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी